कविता आणि लोकगीते यांच्या सादरीकरणातून कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या
पुणे – कोरोनामुळे काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे; पण तरीही सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका, अशी मागणी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली. कविता आणि लोकगीते यांच्या सादरीकरणातून कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या. या वेळी विविध मागण्यांचे फलक हाती घेत, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. ९ ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात चित्रपट, मालिका, नाटकातील पडद्यामागील कलाकार, लोककलाकार, जादूगार आणि नृत्य क्षेत्रातील कलाकार यांनी सहभाग घेतला.