इयत्ता १० वीच्या (सी.बी.एस्.ई. बोर्ड) परीक्षेत हडपसर (पुणे) येथील कुमारी तनिष्का दत्तात्रय जगताप हीने ९०.४० प्रतिशत गुण मिळवले !
हडपसर (पुणे) – येथील कुमारी तनिष्का दत्तात्रय जगताप हीने इयत्ता १० वीच्या (सी.बी.एस्.ई. बोर्ड) परीक्षेत ९०.४० प्रतिशत गुण मिळवले आहेत. तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती तिचा पुष्कळ भाव आहे. ती समष्टी सेवा आणि व्यष्टी साधनाही करते. इंग्रजी भाषांतर करणे, पत्रलेखन करणे, सामाजिक माध्यमातून सेवा करणे, अधून मधून फलक लिखाण करणे, होस्टिंग करणे अशा सेवा ती करते.
१२ वीच्या परीक्षेत राजगुरुनगर (पुणे) येथील स्नेहल संतोष मुळूक हिने ८६.३३ टक्के गुण मिळवले !
राजगुरुनगर (पुणे) – येथील स्नेहल संतोष मुळूक हीे १२ वीच्या परीक्षेत ८६.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. ती व्यष्टी साधनेच्या अंतर्गत प्रार्थना, कृतज्ञता आणि भावप्रयोग करते. समष्टी साधना म्हणून अंक वितरण, सामाजिक माध्यमाद्वारे प्रसाराची सेवा करते.