‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार’ आता ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ नावाने ओळखला जाणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा !

नेहरू-गांधी घराण्याने देशाची अतोनात हानी केली. हे लक्षात घेऊन केवळ पुरस्कारांचे नव्हे, तर या सदस्यांचे ज्या योजनांना किंवा अन्य ठिकाणी नावे दिली असतील, ती पालटावीत, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक

भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारा’चे नाव पालटून ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ केल्याचे घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले की, देशाचा गौरव वाढवणार्‍या अनेक क्षणांचा अनुभव घेत असतांना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार ‘खेल रत्न पुरस्कारा’ला भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या कारकीर्दीत १ सहस्राहून अधिक गोल केले होते. वर्ष १९५६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.