टिळकांचे विचार आत्मसात् करून ते कृतीत आणण्याची आवश्यकता !

१ ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यस्मरण झाले. लोकमान्य टिळक हे विभूतीपदाला गेलेले उच्चकोटी व्यक्तीमत्त्व ! त्यांचे तर्कशुद्ध आणि परखड विचार त्या काळी जेवढे शाश्वत होते, तेवढेच ते आजही आहेत. आजची आपली सामाजिक परिस्थिती पहाता, शिक्षण, आरोग्य, कायदे, सुरक्षा आणि बाकी सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार, लाचखाऊपणा अन् नीतीभ्रष्टता बोकाळली आहे. त्यामुळे आज आपल्याला टिळकांचे विचार आत्मसात् करण्याची आवश्यकता आहे. स्वराज्य मिळाले; मात्र सुराज्य हवे आहे. हे केवळ महान व्यक्तीमत्त्वाची जयंती किंवा पुण्यस्मरण करून होणार नाही, तर त्यासाठी आपण प्रत्येकानेच लोकमान्य टिळकांचे विचार धारण करूया. टिळकांप्रमाणेच खोट्याला खोटे सिद्ध करून सत्याला धैर्याने समोर आणूया. आपली बुद्धी आणि विचार विकले जाणार नाहीत, याची काळजी घेऊया, तरच खर्‍या अर्थाने टिळकांना मानवंदना दिली, असे वाटेल.

– कु.  प्राप्ती महेंद्र गावकर, खांडेपार, फोंडा, गोवा.