साधकांवर चैतन्याचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
धारवाड (कर्नाटक) येथील सौ. विदुला हळदीपूर यांनी श्री गुरुचरणी अर्पण केलेले काव्यपुष्प !
प.पू. गुरुदेव,
मला विदेही अवस्थेची अनुभूती आल्यावर मनात एक लहानशी कविता पुनःपुन्हा गुणगुणली जाते. त्या कवितेला एक लय प्राप्त झालेली असते. मी ही कविता आपल्या दिव्य चरणांशी अर्पण करते.
ना देहाची, ना लोकांची ।
ना गुणांची, ना दोषांची ।
केवळ तुझीच रे गुरुराया, केवळ तुझीच रे ।। १ ।।
ना ‘मदा’ची, ना ‘मोहा’ची ।
ना ‘कामा’ची, ना ‘क्रोधा’ची ।
ना ‘मत्सर’, ना ‘लोभा’ची ।
तुझीच रे, ही तुझीच रे ।
केवळ तुझीच रे गुरुराया, केवळ तुझीच रे ।। २ ।।
प.पू. गुरुदेवा, माझी एक विनंती आहे, ‘मला केवळ संत व्हायचे नाही, तर विदेही संत व्हायचे आहे; म्हणून तोपर्यंत माझी आध्यात्मिक पातळी घोषित करू नये.’
देवा, ‘माझा अहंभाव कधी वाढतो ?’, हे माझ्या लक्षात येत नाही. ‘केवळ आपल्या दिव्य चरणांची सेवा करणे’, हे माझ्या भाग्यात असू दे. ‘माझा समष्टी भाव आणि तळमळ आपल्या कृपेने वाढू दे’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते.
हे गुरुदेवा, अशी माझी स्थिती ।
काय सांगू गुरुराया आता ।
तूच मी आणि मीच तू ।
नाही उरले मी वेगळी ।।
– हे कृपाकर, केवळ आपली अस्तित्वशून्य,
सौ. विदुला हळदीपूर, धारवाड, कर्नाटक. (२०.६.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |