गोवा सरकारकडून ‘म्हादई नदी पाणीतंटा विभागा’ची स्थापना

म्हादई नदी पाणीतंटा

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा शासनाने म्हादई नदी पाणीतंट्याशी संबंधित सर्व सूत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘म्हादई नदी पाणीतंटा विभाग’ या स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. या विभागाचा जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता दिलीप नाईक यांना प्रमुखपद बहाल करण्यात आले आहेत. या विभागात इतर अधिकार्‍यांचीही नेमणूक होणार आहे. या विभागातील अधिकारी केवळ म्हादईशी निगडित काम पहाणार आहेत. कर्नाटक राज्याने यापूर्वीच म्हादईसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केलेला आहे. याविषयी बोलतांना ‘म्हादई बचाव अभियान’चे नेते तथा पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.