हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार नव्हे का ? पोलीस विभागात पसरलेली ही लाचखोरीची कीड कायमची संपवण्यासाठी प्रामाणिक आणि नीतीवान पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे ! – संपादक
पुणे, ३ ऑगस्ट – मारामारीच्या प्रकरणात गुन्हा नोंद न करण्यासाठी दादासाहेब ठोंबरे या बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या हवालदाराने १ लाख ८० सहस्र रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. या प्रकरणी २८ वर्षीय तरुणाने केलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पडताळणीमध्ये ठोंबरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार १ ऑगस्ट या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठोंबरे यांना बारामती शहर परिसरात सापळा रचून लाच घेतांना अटक केली आहे.