स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने एकातरी आतंकवादी संघटनेला संपवले आहे का ?
आगरतळा (त्रिपुरा) – राज्यातील धलाई जिल्ह्यामध्ये बांगलादेश सीमेजवळ असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले. यात एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. आतंकवाद्यांनी या सैनिकांकडील शस्त्रेही पळवून नेली. बंदी घातलेली आतंकवादी संघटना नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एन्.एल्.एफ्.टी.) हिच्याकडून हे आक्रमण करण्यात आले.