बीड – पंधरा मासांपूर्वी सामाजिक माध्यमांतून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिपणी केल्याप्रकरणी सिरसाळा (तालुका परळी) येथील फैसल खान युसुफजई (वय २० वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. कर्णावती पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर फैसल खान युसुफजई याने आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उपस्थित केले.
१. फैसल खान युसुफजई याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरुद्ध कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सामाजिक प्रसार माध्यमांत टिपणी केली होती. या प्रकरणाची नोंद घेऊन कर्णावती शहर सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के. मोदी यांनी फैसल खान याच्याविरुद्ध १८ एप्रिल २०२० या दिवशी जनतेत भीती निर्माण करण्याच्या हेतूने किंवा एखाद्या वर्गाला दुखावण्याच्या हेतूने प्रेरित करणारा मजकूर असल्याचे सांगत गुन्हा नोंद केला होता.
२. राज्य किंवा सार्वजनिक शांततेविरुद्ध गुन्ह्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमान्वये फैसल खान याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली होती. १५ मासांनंतर कर्णावती येथील सायबर गुन्ह्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यात येऊन फैसल खान यास नोटीस बजावली.