घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

‘प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/499023.html

श्री. बबन वाळुंज

ए. रुग्णालयातील अक्षम्य दिरंगाई : २ दिवसांनी आधुनिक वैद्यांनी मला ‘अँजिओग्राफी’चे यंत्र बंद असून ‘ते आज दुरुस्त होईल’, असे सांगितले. ते यंत्र दुसर्‍या दिवशीही दुरुस्त झाले नाही. तेथील आधुनिक वैद्यांना या दिरंगाईविषयी विचारल्यावर त्यांनी आम्हाला ‘केवळ ३ घंटे द्या’, असे सांगितले. या वेळी ‘रुग्णाला पुन्हा छातीत दुखले अन् दगाफटका झाला तर काय ?’, याचा साधा विचारही त्यांच्या मनात आला नाही. केवळ ‘रुग्ण येथून जाऊ नये. देयक वाढत जाईल’, याकडेच त्यांचे लक्ष होते.

(समाप्त)

– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर, मुंबई.