कायदा न पाळण्यात धर्मांध नेहमीच पुढे असतात, याचे हे उदाहरण !
सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – फलटण येथील मेटकरी गल्लीत ३० जुलैच्या रात्री ९ वाजता मोहम्मद सलीम शेख नायलॉनच्या मांजाची विक्री करत असतांना पोलिसांच्या निदर्शनास आला. या वेळी फलटण शहर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे नायलॉनच्या मांजाची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याविषयी न्यायालयाने आदेश दिलेले असूनही हे आदेश धाब्यावर बसवून काही ठिकाणी नायलॉनच्या मांजाची चोरट्या पद्धतीने विक्री होत आहे.