अमेरिकेतील न्यू जर्सी येथील गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याच्या वेळी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. सतविंदर सिंह यांना आलेल्या अनुभूती

१. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात प्रथमच सहभागी होता आल्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटणे आणि तेव्हा मानसरित्या गुरुपूजन करत असतांना सकारात्मकता आणि चैतन्य जाणवून आध्यात्मिक उपाय होणे

‘८.७.२०१७ या दिवशी असलेल्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात मी ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. मला सोहळ्याविषयी पुष्कळ उत्सुकता होती. सोहळा चालू होण्यापूर्वीच मी ‘सोहळ्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत’, यासाठी देवाला प्रार्थना केली. यापूर्वी मी कोणत्याही गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी झाले नव्हते. सोहळा चालू झाल्यावर मला त्यात सहभागी होता आले, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. जेव्हा पू. (सौ.) भावना शिंदे यांनी गुरुपूजनाला आरंभ केला, तेव्हा मीसुद्धा मानसरित्या पूजा करू लागले. त्या वेळी ‘मी प्रत्यक्ष न्यू जर्सी येथील आश्रमात असून पू. (सौ.) भावनाताईंच्या मागे बसले आहे’, असे मला वाटत होते. मला पुष्कळ चैतन्य मिळत होते. मला स्वतःभोवती सकारात्मकता आणि चैतन्य जाणवत होते. माझा भाव जागृत झाला होता आणि नामजप अखंड होत होता.

२. गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यानंतर स्वतःची साधना सहजपणे होत असल्याचे जाणवणे

गुरुपौर्णिमा सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी असणारे साधक जेव्हा त्यांच्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगत होते, तेव्हा माझा भाव जागृत होऊन माझे मन निर्विचार होत होते, तसेच माझे ध्यानही लागत होते. मी यापूर्वी हे कधीच अनुभवले नव्हते. त्या दिवसानंतर माझी साधना सहजतेने होऊ लागली आहे. मी नामजपादी उपाय करतांना मला स्थिरता आणि आनंद जाणवतो. त्याचप्रमाणे साधनेसाठी घेतलेली लहान लहान ध्येये सहजतेने साध्य होत आहेत.

या अद्भुत सोहळ्यात आम्हा सर्वांना सहभागी करून घेतल्याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. सतविंदर सिंह, अमेरिका (२७.७.२०१७)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक