जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी दिसले संशयास्पद ड्रोन्स !

सुरक्षादलांनी गोळीबार केल्यावर ड्रोन्स माघारी गेले !

पाकिस्तानी ड्रोन्स भारतात घुसखोरी करतात, तसे भारताकडून पाकमध्ये ड्रोन्स पाठवून कारवाई का केली जात नाही ?

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यात ड्रोन (मानवरहित हवाई वाहन) दिसण्याच्या घटना अद्यापही चालूच आहेत. २९ जुलैच्या रात्री सांबा जिल्ह्यामधील ३ ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन्स उडतांना दिसून आले.

सुरक्षादलाच्या सैनिकांनी या ड्रोन्सवर गोळीबार केल्यानंतर हे ड्रोन्स या ठिकाणांहून माघारी गेले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ ते साडेऊनच्या सुमारास बारी-ब्राह्मणा, चिलाद्या आणि गगवाल या परिसरांमध्ये एकाच वेळी हे ड्रोन्स दिसले. यांपैकी २ ड्रोन्स सैनिकी छावणीजवळ, तर एक इंडियो तिबेटीयन पोलीस छावणीजवळ दिसून आले.