गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘पंतप्रधान आवास योजने’चे ८० टक्के लाभार्थी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान !

आतापर्यंत अनेक आतंकवादी प्रकरणांत रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशांना आधार कार्ड आदी देणार्‍या संबंधित सरकारी अधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून आजन्म कारागृहातच डांबायला हवे !

भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर व त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना लिहिलेले पत्र

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी अधिकार्‍यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना पंतप्रधान आवास योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, असा आरोप भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केला आहे. अशा लाभार्थ्यांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक असून या प्रकरणाची चौकशी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी आमदार गुर्जर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्र लिहून केली आहे.

यासंदर्भात आमदार गुर्जर यांनी संबंधित विभागाकडून माहिती मागवली असता त्यात ही माहिती स्पष्ट झाली. ज्या लोकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओळखपत्रे देण्यात आली आहेत, त्यांची तपासणी करण्यात येऊन ती रहित करावीत, तसेच या प्रकरणाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार गुर्जर यांनी केली आहे.