पाकमध्ये हिंदु तरुणीचे शेजारी रहाणार्‍या धर्मांधाकडून अपहरण

  • पोलिसांनी केली सुटका, तर न्यायालयाने पालकांकडे सोपवले !

  • राखी बांधत असणार्‍या धर्मांध तरुणाकडूनच अपहरण आणि विवाह

पाकमधील धर्मांधांना हिंदूंच्या समवेतचे कोणतेही नाते मान्य नसते, हे यातून लक्षात येते !

राखी बांधत असणार्‍या धर्मांध तरुणाकडूनच अपहरण आणि विवाह

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील रीना मेघवार या हिंदु युवतीचे धर्मांधाने अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. त्यानंतर त्याने तिच्याशी विवाह केला. या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिला पालकांकडे सोपवण्याचा आदेश दिला.

१. रीना हिचे अपहरण तिच्या शेजारी रहाणार्‍या कासिम काशखेली याने केले होते, तसेच बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला होता. विशेष म्हणजे रीना कासिम याला रक्षाबंधनाच्या वेळी राखी बांधत होती. १३ फेब्रुवारी या दिवशी तिचे अपहरण करण्यात आले होते. याविषयी तिने व्हिडिओ बनवून प्रसारित करून साहाय्य मागितल्यावर पाक प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि तिची सुटका करण्यात आली.

२. रीना हिने व्हिडिओमध्ये म्हटले होते, ‘मला माझ्या पालकांकडे पाठवा. मला बलपूर्वक येथे आणले आहे. मला गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी दिली आहे. माझ्या आई-वडिलांना आणि भावाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.’ या वेळी तिने कुणाचेही नाव घेतले नव्हते.

३.सिंध सरकारने या व्हिडिओची नोंद घेत चौकशीचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी कासिमच्या घरातून रीना हिची सुटका केली होती. नंतर तिला स्थानिक न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. त्या वेळी तिने म्हटले की, मी इस्लामचा स्वीकार केला नाही. माझ्याशी विवाह केल्याचे कासिम याने खोटी कागदपत्रे सिद्ध केली.