खारघर (नवी मुंबई) येथील साधक श्री. अनंत मोहन बद्दी यांना गुरुपूजनाला बसल्यानंतर आलेल्या अनुभूती

१. गुरुपूजन करतांना ‘स्वतःसमोर गुरुपरंपरेची छायाचित्रे नसून ‘प्रत्यक्ष संतच बसले आहेत आणि ते स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवणे

‘वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेला गुरुपूजनाला बसण्याची संधी मिळाली आणि आम्हा उभयतांना अतिशय आनंद झाला. सात्त्विक वस्त्रे परिधान केल्याने आम्हाला पुष्कळ हलके वाटत होते. गुरुपूजन करतांना ‘समोर प.पू. श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले स्मितहास्य करत आहेत अन् ‘ही छायाचित्रे नसून प्रत्यक्ष संतच बसले आहेत’, असे मला जाणवत होते.

२. घरात होणार्‍या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापेक्षा गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी ईश्वरी तत्त्वाची जाणीव अधिक होणे

पूजाविधीत अक्षता आणि फुले वहातांना परात्पर गुरु डॉक्टर ‘कर…कर’, असे म्हणत असल्याचे मला सूक्ष्मातून ऐकू आले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे’, असे जाणवले. घरात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होतात, त्यापेक्षा येथे ईश्वरी तत्त्वाची जाणीव अधिक प्रमाणात होत होती. तेव्हा वातावरण मंगलमय आणि दिव्य शक्तीने भारित झाल्याचे मला जाणवले.

‘हे कृपाळू गुरुमाऊली, तू माझ्यावर कृपा करून मला गुरुपूजनाची संधी देऊन अनुभूती दिल्यास, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अनंत मोहन बद्दी, खारघर, नवी मुंबई. (१९.७.२०१९)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.