१. पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या समवेत नामजप करतांना थोड्याच वेळात एकाग्रतेने नामजप होणे, ‘पाठ आणि कंबर यांचे दुखणे कधी न्यून झाले’, ते न समजणे अन् नामजप पूर्ण झाल्यानंतर हलकेपणा जाणवून आनंद होणे
‘१३.४.२०२१ या दिवशी पू. (सौ.) शैलजा परांजपे साधकांसाठी नामजप करतांना मी त्यांच्या समवेत बसून नामजप करत होते. त्या आधी २ दिवसांपासून मला पाठदुखी आणि कटीशूल (कंबरदुखी) यांचा तीव्र त्रास होत होता. त्यामुळे मी २ दिवस झोपूनच होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पू. परांजपेकाकूंच्या समवेत बसून नामजप करतांना ‘मी एक घंटा बसून नामजप करू शकणार नाही’, असे मला वाटत होते. ‘तेथे थोडा वेळ बसून नंतर खोलीत झोपूनच नामजप करावा’, असा विचार माझ्या मनात येत होता. नंतर पू. परांजपेकाकूंच्या समवेत नामजप करतांना थोड्याच वेळात माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला आणि ‘माझे पाठ अन् कंबर यांचे दुखणे कधी न्यून झाले’, ते मला समजलेच नाही. नामजपाची वेळ संपल्यानंतर मला हलकेपणा जाणवून आनंद झाला.
२. ‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत’, हे अनुभवायला मिळणे
‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत’, हे मला अनुभवायला आले. ‘संत करत असलेल्या नामजपाच्या माध्यमातून त्यांच्यातील चैतन्य कार्यरत होते’, याची मला प्रचीती आली. त्याविषयी मी परात्पर गुरुदेव आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |