सौदीतील धर्मांधांनी बनावट फेसबूक खात्याद्वारे हिंदूला अडकवलेे होते !
हिंदूंना खोट्या गन्ह्यांत अडकवणार्या धर्मांधांची मानसिकता लक्षात घ्या ! बांगलादेशात अशाच प्रकारे हिंदूंवर आरोप करून त्यांच्या घरांवर आक्रमणे करण्यात आली होती ! धर्मांधांचा हा नवा जिहाद असून यापासून सावध रहा !
नवी देहली – सौदी अरेबियामध्ये डिसेंबर २०१९ पासून अटक करण्यात आलेले भारतीय नागरिक हरिष बंगेरा यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान आणि मुसलमानांचे पवित्र धार्मिक स्थळ मक्का यांच्याविषयी सामाजिक माध्यमांतून अयोग्य टिपणी केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात बंगेरा यांच्या नावाने बनावट खाते उघडून सौदीतील अब्दुल हुएज आणि अब्दुल थुएज या दोघा मुसलमान भावांनी याविषयी टिपणी केली होती. त्यांनी बंगेरा यांच्या नावाने बनावट फेसबूक खाते उघडून या टिपण्या केल्या होत्या. यात मक्केचे छायाचित्र पोस्ट करून ‘पुढील श्रीराममंदिर मक्केमध्ये असेल. लढाईसाठी सिद्ध व्हा’, असे म्हटले होते. यानंतर बंगेरा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना नोकरीवरूनही काढण्यात आले होते. याविषयीची वस्तूस्थिती समजल्यावर पोलिसांनी अब्दुल हुएज आणि अब्दुल थुएज यांना अटक केल्यानंतर बंगेरा यांच्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला.