दृष्ट काढते प.पू. गुरुदेवांची ।
लागली का दृष्ट त्या पापी चांडाळाची ।। धृ. ।।
धर्माला आली ग्लानी ।
धर्म रक्षण्या अवतरूनी ।
जमवले हिंदु धर्माभिमानी ।
म्हणून का लागली दृष्ट घरादाराची ।। १ ।।
सत्संग, धर्मजागृती सभा घेऊनी ।
निद्रिस्त हिंदूंस जागृत करूनी ।
तन, मन अन् धनाचा त्याग करवूनी ।
म्हणून का लागली दृष्ट भूताखेतांची ।। २ ।।
३० वर्षे सूर्य तळपला (टीप १) ।
आपणासारिखे केले साधकाला ।
एकशे आठ साधक गेले संतपदाला ।
म्हणूनी का लागली दिठी (टीप २) तिठीची ।। ३ ।।
देश विदेशांत साधना चालू झाली ।
धर्माचरणाला प्रारंभ झाला ।
नामस्मरणाने घरे दुमदुमली ।
आस धरली ईश्वरप्राप्तीची ।। ४ ।।
गुरुदेवांची प्राणशक्ती न्यून झाली ।
डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली ।
तरीपण प्रयत्नांत कसूर नाही झाली ।
म्हणून का लागली असेल दृष्ट त्याची (टीप ३) ।। ५ ।।
वेळ येईल अनिष्ट शक्तींच्या नष्ट होण्याची ।
ईश्वरी राज्य येईल ।
संकल्प पूर्ण होईल ।
सगळीकडे आनंदीआनंद होईल ।। ६ ।।
भाव माझा भोळा भाबडा ।
वेडावाकडा प्रयत्न केला ।
सांभाळून घ्या या खुळ्या वेडीला ।
दासी आपुल्या चरणांची ।। ७ ।।
टीप १ – सूर्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत आणि ३० वर्षांपासून त्यांचे कार्य सूर्याप्रमाणे तळपत, म्हणजे वृद्धींगत होत आहे.
टीप २ – दृष्ट
टीप ३ – ज्या कुणाची लागली असेल, त्याची
– (पू.) श्रीमती माया गोखले, चिंचवड, पुणे. (वर्ष २०१०)