आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ३ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना हेल्थकिटचे वाटप

आषाढी वारी (प्रातिनिधिक छायाचित्र)

पंढरपूर (सोलापूर) – आषाढी वारीच्या निमित्ताने येथे कोरोना संसर्गाविषयीचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीसदलाने अनुमाने ३ सहस्र पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे; मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलीस कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सर्व पोलीस कर्मचार्‍यांना हेल्थकिटचे वाटप केले आहे. या वेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम हेही उपस्थित होते.

आषाढी वारीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर शहरात १८ ते २४ जुलै या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर पंढरपूर तालुक्यातील १० गावांमध्ये १८ ते २२ जुलै या कालावधीत संचारबंदी असणार आहे.