वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी साधिकांना देवता आणि ऋषी यांचे सूक्ष्मातील अस्तित्व अनुभवयास मिळणे

गुरुपौर्णिमा

सौ. मंजुषा पवार, अकलूज

१. ‘गुरुपूजन चालू असतांना ‘तेथे सर्व देवता आणि ऋषी उपस्थित आहेत. हे गुरुपूजन वैकुंठात होत आहे, तसेच शंखनाद ऐकू येत आहे’, असे मला जाणवले.

२. मला गुरुमाऊलींचे कोमल चरण सतत दिसत होते. त्यामुळे अंतर्मुखता वाढून माझा कृतज्ञताभाव दाटून येत होता.

३. कु. दीपालीताई (कु. दीपाली मतकर) भावप्रयोग घेत होती. तेव्हा तिच्या प्रत्येक शब्दातून पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्या वेळी माझ्या अंगावर शहारे येत होते.’

सौ. भांगे, बारामती

१. ‘पूजेला आरंभ झाल्यापासून मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद मिळत होता. त्या वेळी मला देवतांचे अस्तित्व अनुभवता येत होते.

२. सद्गुरु स्वातीताईंच्या (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या) मार्गदर्शनानंतर माझा केवळ ‘कृतज्ञता’, असाच नामजप होत होता. त्या वेळी माझे मन आतून शांत झाले आणि एका लयीत नामजप होऊ लागला.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक