देहलीमध्ये २ सहस्र ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

कित्येक दशकांपासून चालणारी अमली पदार्थांची तस्करी रोखू न शकणे, हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

नवी देहली – देहली पोलिसांनी २ सहस्र ५०० कोटी रुपयांचे ३५४ किलो हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात अफगाणिस्तानच्या एका नागरिकाचा समावेश आहे. अमली पदार्थ ‘कंटनेर्स’मध्ये लपवून समुद्रमार्गे मुंबईला येते आणि तेथून देहलीला पाठवले जाते.

मध्यप्रदेशातील शिवपुरी येथील कारखान्यामध्ये या अमली पदार्थावर प्रक्रिया करून ते अधिक दर्जेदार केले जाते. तेथून ते पंजाबमध्ये पाठवले जाते.