इस्लामी देशांच्या संघटनेकडून काश्मीरमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याचा भारताला प्रस्ताव !

भारतातील मुसलमानांसमवेत होणारा कथित भेदभाव याविषयी भारतीय राजदूतांशी चर्चा !

  • काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे अन्य कोणत्याही देशांच्या संघटनेने नाक खुपसू नये, असे भारताने या संघटनेला परखडपणे सांगायला हवे.
  • इस्लामी देशांमध्ये अल्पसंख्यांकांसमवेत विशेषतः हिंदूंसमवेत कसे व्यवहार केले जातात, हे जगाला ठाऊक आहे. भारतात मुसलमानांसमवेत भेदभाव होतो, हे पहाणारी इस्लामी देशांची संघटना हिंदूंवरील या अत्याचारांविषयी चकार शब्दही बोलत नाही, हे लक्षात घ्या !

रियाध (सौदी अरेबिया) – ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांच्या संघटनेचे सरचिटणीस युसूफ अल्-ओथइमीन यांनी  सौदी अरेबियातील जेद्दा येथे भारतीय राजदूतांची भेट घेतली. या भेटीत भारतातील मुसलमानांसमवेत होणारा भेदभाव आणि काश्मीर यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये ओ.आय.सी.चे एक शिष्टमंडळ पाठवण्याचाही प्रस्ताव ओथइमीन यांनी भारताला दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा चर्चा चालू व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय दूतावास अथवा परराष्ट्र मंत्रालय यांनी याविषयी कोणतेही वक्तव्य प्रसिद्ध केलेले नाही. यापूर्वी भारताने कलम ३७० रहित केल्यावर ओ.आय.सी.ने टीका केली होती.