वर्धा येथे २ लहान मुलांचा अमानुष छळ केल्‍याप्रकरणी सावत्र आई आणि वडील अटक !


वर्धा – तालुक्‍यातील एका गावात ८ वर्षीय एक मुलगा आणि ११ वर्षीय मुलगी या दोन्‍ही मुलांना मारहाण करून त्‍यांचा अमानुष छळ केल्‍याप्रकरणी पोलिसांनी मुलांच्‍या सावत्र आई आणि वडील यांना अटक केली आहे. ‘चाईल्‍ड लाईन आणि महिला अन् बालकल्‍याण विभागा’च्‍या प्रयत्नानंतर पुलगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

२ दिवसांपूर्वी ‘चाईल्‍ड लाईन’च्‍या १०९८ ‘हेल्‍पलाईन’वर २ लहान बहीण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्‍याची तक्रार मिळाली होती. गेल्‍या काही मासांपासून या मुलांना सतत मारहाण चालू होती. त्‍यांच्‍या शरिरावर जखमा झाल्‍या होत्‍या. एवढेच नव्‍हे, तर आई-वडील यांनी या मुलांना अरण्‍यात सोडण्‍याचा निर्दयीपणाही केला आहे. मुलांना अनेकदा उपाशीही ठेवले जात असे.