‘७.८.२०२० या दिवशी ‘आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांना प.पू. दास महाराज यांच्या गंभीर तोंडवळा असलेल्या छायाचित्राकडे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. प.पू. दास महाराज यांच्या गंभीर तोंडवळा असलेल्या छायाचित्राकडे पाहून आरंभी माझे डोके पुष्कळ जड झाले. त्यानंतर थोड्या वेळाने मला हलकेपणा जाणवला.
२. ‘प.पू. दास महाराज यांच्या छायाचित्राच्या मागे मला श्रीविष्णु उभा आहे’, असे दिसले. त्यानंतर थोड्या वेळाने मला श्रीराम दिसला. नंतर एक आड एक मला श्रीराम आणि प.पू. गुरुदेव श्रीरामाच्या रूपात दिसत होते.
३. ‘प.पू. गुरुदेव शेषासनावर विराजमान आहेत’, असे मला दिसले. नंतर थोड्या वेळाने मला ‘महादेवावर अभिषेक होत आहे’, असे दिसले.
४. त्यानंतर प्रयोगाची वेळ संपेपर्यंत ‘महादेवाचे अनिष्ट शक्तींसह सूक्ष्मातील युद्ध चालू आहे’, असे मला दिसले.
– श्री. मनोज नारायण कुवेलकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.
(ऑगस्ट २०२०)
|