गोकुळच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना २ रुपये दरवाढ देण्यासाठी प्रशासकीय व्यय अल्प करा ! – सतेज पाटील, पालकमंत्री


कोल्हापूर, २९ जून – गोकुळच्या टँकर वाहतुकीचे दर हे अन्य दूध संघांच्या तुलनेत अधिक आहेत. त्याची पुनर्रचना करावी लागेल. दूध उत्पादक शेतकर्‍यांना २ रुपये दरवाढ देण्यासाठी प्रशासकीय व्यय अल्प करावा लागेल, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या मुख्यालयात सतेज पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी यांनी भेट दिली. त्या वेळी या सूचना त्यांनी केल्या.

या वेळी सतेज पाटील म्हणाले, ‘‘सध्या असणारे १३ लाख लिटर दूध संकलन हे प्रतिदिन २० लाख लिटरवर जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आगामी काळात नवनवीन आव्हाने स्वीकारतांना गोकुळच्या सर्व प्रशासकीय विभागाने मनात कोणतेही दडपण न ठेवता त्यांच्या सूचना मांडाव्यात आणि सकारात्मकतेने कार्य करावे.’’ या वेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नूतन अध्यक्ष विश्वास नारायण तथा आबाजी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार विनय कोरे यांसह अन्य उपस्थित होते.