सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. मनोज खाडये यांनी घेतलेल्या व्याख्यानाला प्रसिद्धीमाध्यमांकडून मिळालेला प्रतिसाद आणि जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ याविषयी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेले व्याख्यान

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

नुकतेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान झाले. यामध्ये सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन २८ जून या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले. या ऑनलाईन मार्गदर्शनाला जिज्ञासूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या व्याख्यानाचा धर्मप्रेमींनी कशा प्रकारे प्रसार केला याविषयीची सूत्रे २८ जून या दिवशी वाचली. आजच्या लेखात प्रसिद्धीमाध्यमांनी व्याख्यानापूर्वी आणि त्यानंतर केलेली प्रसिद्धी अन् कार्यक्रमानंतर जिज्ञासूंनी दिलेले उत्स्फूर्त अभिप्राय पहाणार आहोत. या वेळी अनेकांनी ‘व्याख्यानातील विषय अभ्यासपूर्ण असल्यामुळे तो पुष्कळ आवडला. व्याख्यानामुळे हिंदु धर्मावरील संकटाविषयी योग्य माहिती मिळाली, तसेच धर्माचरण, नामजप, साधना आदींचे महत्त्व समजले. यापुढे आम्हीही हिंदु धर्मासाठी कार्य करू’, असे अभिप्राय व्यक्त केले आहेत.


सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. मनोज खाडये यांनी केलेल्या मार्गदर्शनावर जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. सौ. रूपाली चव्हाण, सांगोला – आजचे व्याख्यान ऐकून हिंदू किती मागे आहेत, हे लक्षात आले. आईला ‘मम्मी’ म्हणून हाक न मारता ‘आई’ म्हणण्यामागील शास्त्र समजले. मुलांना शाळेतच हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्यक आहे.

२. सौ. महादेवी कुंनुरे, जत्रट, जिल्हा कोल्हापूर – व्याख्यान ऐकून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी वेळ द्यायला हवा, असे वाटत आहे. ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला आहे. शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धतीचा अवलंब करायला हवा, असे वाटते.

३. श्री. मयुर जोशी, सांगली – कार्यक्रम छान होता. व्याख्यान ऐकतांना अंगावर शहारे येत होते, चैतन्य जाणवण्यासह सुगंध येत होता. धर्माचरण कसे करावे ? नमस्कार कसा करावा ? याविषयी पुष्कळ महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. अशा प्रकारे घेण्यात येणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात मला सहभागी होण्यास आवडेल.

४. गोवा येथील सौ. सुजाता लंबोर यांनी व्याख्यानातील विषय ऐकल्यानंतर सांगितले, ‘‘हे व्याख्यान मी उद्या देवालयात सर्व महिलांना ऐकवण्याचे नियोजन करणार आहे.’’

५. सौ. अनुराधा कागदे, चिंचवड, पुणे – व्याख्यान ऐकून मन प्रसन्न झाले. आपल्या संपर्कातील सर्वांना नामजप आणि साधनेचे महत्त्व सांगायला हवे, हे लक्षात आले.

६. सौ. सुधा पिंपळे, सिंहगड रस्ता, पुणे – माझ्या नणंदेने त्यांच्या कुटुंबियांसह व्याख्यान ऐकले. त्यांना विषय पुष्कळ आवडला. त्यांनी सांगितले की, हा विषय भ्रमणभाषवरही प्रसारित करायला हवा, इतका महत्त्वपूर्ण विषय आहे.

७. श्री. विलास उंबरजे, पुणे – आपण घरात असल्यामुळे बाहेर काय चालू आहे, ते कळत नाही. व्याख्यानातील अनेक महत्त्वाचे विषय माहिती नव्हते, ते या व्याख्यानाच्या माध्यमातून समजले.

८. सौ. तेजस्विनी तंवर, हितचिंतक, सोलापूर – व्याख्यान छान होते. या व्याख्यानाविषयी आम्हाला कळवल्याविषयी तुमच्या सर्वांचे आभार ! ज्याप्रमाणे व्यवसाय चालवण्यासाठी ‘व्यवस्थापन’ शिकण्याची आवश्यकता आहे, तसेच जीवन आनंदमय बनवण्यासाठी जीवनाचे ‘व्यवस्थापन’ शिकण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्मामध्ये जीवनाच्या ‘व्यवस्थापनाचे’ शास्त्र आहे.

९. सौ. संगीता भोसले, सांगली – व्याख्यानामुळे अनेक प्रकारच्या जिहादांविषयीची वास्तविकता लक्षात आली. येणार्‍या भीषण आपत्काळाविषयी जाणीव झाल्यावर भक्त बनणे आवश्यक आहे, हे लक्षात आले.

१०. श्री. विश्वजीत पाटील, येळावी, तासगाव, सांगली – कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला. सद्यःस्थितीत हिंदूंनी संघटित होऊन अन्यायाविरुद्ध एकत्रित आवाज उठवणे आवश्यक आहे. मी माझ्या संपर्कातील युवकांना एकत्रित करून त्यांनाही हा विषय सांगीन, तसेच हिंदूसंघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करतो.

११. श्री. सचिन चव्हाण, तासगाव, सांगली – श्री. मनोज खाडये यांचा विषय ऐकून अंगावर शहारे आले. त्यांनी मांडलेली सद्यःस्थिती सडेतोड आणि अभ्यासपूर्ण होती.

१२. श्री. संदीप माधव मुळे, तासगाव, सांगली – सद्यःस्थितीत मनाची स्थिरता कशी ठेवावी, तसेच मन स्थिर ठेवण्यासाठी ‘नामस्मरण’ करणे महत्वाचे आहे, हे लक्षात आले. त्याप्रमाणे मी नामस्मरणाला प्रारंभ केला आहे.

१३. सौ. स्वाती सुहास नामदास, धाराशिव – व्याख्यानाद्वारे धर्माचरणांच्या कृतींचे महत्त्व लक्षात आले. त्याप्रमाणे स्वतः कृती करण्यास चालू करणार, तसेच इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करणार.

१४. कु. गौरव चौगुले, ईश्वरपूर (धर्मप्रेमी) – कार्यक्रम छान होता. हिंदूंमध्ये एकी नसल्याने इतरांना त्याचा लाभ होत आहे, हे लक्षात आले. हिंदूंचे संघटन वाढायला हवे. ‘हलाल’ उत्पादने खरेदी न करण्याचे ठरवले आहे. मी तुमच्या कार्यात सहभागी होणार आहे.

१५. श्री. बबन सावंत, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, ईश्वरपूर, सांगली – कोरोनारूपी संकटकाळात नामजप आणि साधना आवश्यक आहे. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हायला हवेत.

१६. माणिक गोपाळ पाटील, चिपळूण, रत्नागिरी – कार्यक्रम ऐकतांना पुष्कळ माहिती नव्याने मिळाली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘लव्ह जिहाद’चे वास्तव मांडले. हिंदूंनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा हातातून वेळ निघून जाईल. दोन्ही वक्त्यांनी संवेदनशील विषय मांडले. व्याख्यान ऐकतांना अंगावर शहारे येत होते. मी शक्य तितके धर्मजागृतीचे कार्य करण्यासाठी प्रयत्न करीन.

१७. मानसी मंदार फळणीकर – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिंहाचा वाटा उचलण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

१८. डॉ. नितीन बोरकर, भूतपूर्व संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्गो फार्मा रिसर्च, बोरी, गोवा – जिहाद, बलपूर्वक धर्मांतर, नक्षली वृत्ती, आतंकवाद्यांना होणार्‍या निधी पुरवठ्यावर नियंत्रण, बनावट (खोटे) चलन आणि धार्मिक चिन्हे, तसेच विविध ट्रस्ट यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मशिदी, चर्च आणि मंदिरे येथील धार्मिक ठिकाणचे साहित्य कायद्यानुसार नियंत्रित करणे आवश्यक आहे.

१९. श्री. बबन पेडणेकर, सिंधुदुर्ग – मला २० जूनच्या रात्री संपूर्ण रात्र झोप न लागल्याने काम करतांना अस्वस्थ होऊन चिडचिड होत होती. व्याख्यानातील सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन चालू होताच ‘त्यांच्या वाणीतील चैतन्य माझ्या कानातून संपूर्ण देहात जात आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवत होते. झोप नसल्याने आलेली सगळी मरगळ दूर होऊन चैतन्य, उत्साह आणि आनंद जाणवत होता. मी सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी यांचा साधक असून मी बैठकीला नियमित जात असे; पण सध्या कोरोना संसर्गामुळे मागील वर्षभर सत्संगाचा लाभ घेता आला नाही; म्हणूनच ‘साक्षात् माझे सद्गुरुच सद्गुरु स्वातीताईंच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधत आहेत’, असे मला वाटत होते. मला ही अनुभूती दिल्याविषयी मी माझ्या सद्गुरूंचा आणि सनातन संस्थेचा आभारी आहे.

२०. श्री. आणि सौ. कोकाटे, सिंधुदुर्ग – सर्वत्र अधर्म वाढलेला असतांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी अविरतपणे सेवारत असल्याचे पाहून देवच हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहे, याची मला खात्री पटली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. मनोज खाडये यांचे मार्गदर्शन लाभल्याविषयी आम्ही आभारी आहोत.

२१. श्री. संजय वेंगुर्लेकर, मंदिर विश्वस्त, आंदुर्ले – सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण तणावमुक्त कसे राहू शकतो, याविषयी मोलाची माहिती मिळाली. व्याख्यान ऐकल्याने एक नवीन ऊर्जेचा प्रवाह निर्माण झाला.

२२. साधना सत्संगात सहभागी असलेल्या हरियाणा येथील सौ. जयश्री गोडसे यांचा रेल्वे प्रवास करतांना गीता मगर यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे सौ. गोडसे यांनी व्याख्यानाची ‘यू ट्यूब लिंक’ गीता मगर यांना पाठवली. या वेळी गीता मगर यांनी व्याख्यान ऐकल्यानंतर सांगितले की, पुष्कळ दिवसांपूर्वी सनातन संस्थेविषयी माहिती मिळाली होती; पण मी ते मनावर घेतले नाही. आजचा विषय ऐकून माझी चूक लक्षात आली. त्याच वेळी मी संस्थेच्या संपर्कात राहून साधना करायला हवी होती. आता मला संस्थेच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे.

विशेष सूत्रे

  • सातारा येथील श्रीमती स्मिता गायकवाड यांनी ओळखीच्या व्यक्तींना व्याख्यानाची ‘पोस्ट’ पाठवली. सद्गुरु स्वातीताईंनी ‘मम्मी’ न म्हणता ‘आई’ म्हणण्यामागील शास्त्र सांगितले. ते ऐकून त्यांच्या दोन्ही लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे ‘आम्ही मम्मी न म्हणता ‘आई’ अशीच हाक मारणार’, असे सांगितले.
  • रानंद (जिल्हा सातारा) या गावात संपूर्ण कार्यक्रमाचे ऑडिओ प्रक्षेपण करण्यात आले होते.
  • सातारा जिल्ह्यातील साधक श्री. अरुण पाटील यांनी त्यांच्या घरातील ‘होम थिएटर’वर (घरामध्ये लावण्याची मोठ्या आवाजातील ध्वनी यंत्रणा) व्याख्यान लावले होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे लोक थांबून विषय ऐकत होते.
  • भडवळे (रत्नागिरी) येथे इंटरनेटची अडचण असल्याने ५ ते ६ जण व्याख्यान ऐकण्यासाठी २ किलोमीटर चालत अन्य एका घरात जेथे ‘रेंज’ आहे, तेथे गेले आणि व्याख्यान ऐकले. यासाठी धर्मप्रेमी श्री. अशोक रेवाळे यांनी पुढाकार घेतला.
  • तामोंड (रत्नागिरी) या गावाचे सरपंच श्री. गंगाराम हरावडे यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क होत नव्हता; मात्र केवळ ‘व्हॉट्सॲप’ वरील संदेश वाचून स्वतः समवेत ६ जणांना घेऊन व्याख्यान ऐकले.
  • सिंधुदुर्ग येथील श्री. दीपक कांबळी यांनी २६६ जणांना व्याख्यानाची ‘लिंक’ पाठवली, तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने व्याख्यान ऐकावे, यासाठी त्यांना भ्रमणभाषद्वारे संपर्कही केले.
  • कसाल (सिंधुदुर्ग) येथील श्री. रामचंद्र तळवडेकर यांनी व्याख्यान संपल्यानंतर त्वरित हे व्याख्यान अन्य ६ परिचितांना ऐकण्यासाठी पाठवले.