श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २३ जूनला श्री शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदवी स्वातंत्र्यदिन !


कोल्हापूर – प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बुधवार, २३ जूनला श्री शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदवी स्वातंत्र्यदिन सांगली आणि कोल्हापूर येथे शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक, स्मारक स्थळी पुष्प सजावट आणि साखर-पेढे वाटप करून हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेकजणांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे; म्हणूनच यावर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने कोल्हापुरातील २०० गरजू कुटुंबांना गोड भोजनाचे डबे वाटप करण्यात येणार आहेत.