आम्ही योग्य कारवाई करत आहोत ! – भारतीय सर्वेक्षण विभागाचे हिंदु विधीज्ञ परिषदेला उत्तर

बीबीसीकडून भारताचे चुकीचे मानचित्र दाखवल्याचे प्रकरण

( या चित्राच्या माध्यमातून कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतु नसून भारताच्या मानचित्रात कशी चूक केली आहे, ते कळावे, यासाठी दिले आहे. )

मुंबई – बीबीसी वृत्तवाहिनीने तिच्या कोरोनाविषयीच्या एका वृत्ताच्या व्हिडिओमध्ये भारताचे मानचित्र (नकाशा) दाखवतांना जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  दोन्ही भाग न दाखवल्याने राष्ट्रप्रेमींकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर बीबीसीने मानचित्र काढून तेथे राष्ट्रध्वजाचे चित्र लावले; मात्र योग्य मानचित्र लावण्याचे टाळले. या विषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ट्वीट करतांना भारतीय सर्वेक्षण विभागाला ‘मेन्शन’ करत (उद्देशून) यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या ट्वीटला भारतीय सर्वेक्षण विभागाने उत्तर देतांना ‘तुम्ही सांगितलेला विषय आम्ही विचारात घेतला असून त्याच्यावर योग्य कारवाई करणार आहोत’, असे म्हटले आहे.