भाग्यनगर येथे दोघा हिंदूंकडून इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान करणारा व्हिडिओ अपलोड करून भगवान शिवाचा अवमान !

  • विरोधानंतर व्हिडिओ हटवला !

  • आमदार टी. राजासिंह यांच्याकडून पोलिसांत तक्रार !

(डावीकडे) चित्तीन मट्टा, (उजवीकडे) कृतिका गौरा

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील कृतिका गौरा आणि चित्तीन मट्टा यांनी इन्स्टाग्रामवरून प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये हिंदु देवतांचा अश्‍लील भाषेत अवमान केला आहे. या दोघांनी त्यांच्या व्हिडिओत ‘भगवान शिव यांनी त्यांचे आपले गुप्तांग कापले’ असे लिहिले आहे. या व्हिडिओमुळे वाद झाल्यावर तो इन्स्टाग्रामवरून हटवण्यात आला आहे. तथापि गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी देवतांचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे तक्रार करून केली आहे.

वरील व्हिडिओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे व्हिडिओ प्रसिद्ध केली आहे. – संपादक