महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक समस्यांविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन !

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देतांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते

सांगली, ८ जून (वार्ता.) – गेले दीड वर्षे कोरोना महामारीमुळे सर्व ठप्प आहे. विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. महाविद्यालयीन शुल्क,  लांबलेले शैक्षणिक वर्ष, निकालातील संभ्रमावस्था, पुढील शैक्षणिक वर्ष कधी चालू होणार ? परीक्षांमधील गोंधळ, अशा असंख्य प्रश्‍नांमुळे विद्यार्थी हतबल झालेला आहे. तरी महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक समस्यांविषयी लक्ष घालावे, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले.