आवश्यकता वाटल्यास अमेरिकेशीही संघर्ष करू ! – इस्रायल

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अवीव (इस्रायल) – वर्ष २०१५ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला अणू करार पुन्हा एकदा लागू करण्यासाठीच्या वाटाघाटी चालू आहेत. इस्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. इस्रायलवर येणार्‍या संकटांशी लढतांना आवश्यकता वाटल्यास अमेरिकेशीही संघर्ष करू, अशी चेतावणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली आहे. अमेरिका आणि इराणमधील अणू करार झाल्यास इराणवरील आर्थिक निर्बंध उठणार आहेत.