लातूर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

पावसामुळे आंब्यांची हानी

लातूर – ७ मे या दिवशी येथील शहर आणि जिल्ह्यात वातावरणात पालट झाल्याने वादळी वार्‍यासह पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. येथील निलंगा तालुका, कोतलशिवणी आणि परिसर, उदगीर तालुका, औसा तालुका, जळकोट तालुका आदी अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे आंब्यांची हानी झाली आहे.