जपानच्या पंतप्रधानांचे निवासस्थान भुताच्या भीतीने ९ वर्षे रिकामीच !

जपानमध्ये अंनिसवाले नाहीत, हे बरे झाले अन्यथा पंतप्रधानांना ‘विज्ञानविरोधी’ संबोधून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असती !

जपानच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान मानले गेलेले ‘सोटी कटोरी’

टोकियो (जपान) – जपानच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान मानले गेलेले ‘सोटी कटोरी’ येथेे भुताचा वावर असल्याच्या भीतीने गेली ९ वर्षे तसेच पडून आहे. तेथे सध्या कुणीही रहात नाही. तरीही प्रतिवर्ष कोट्यवधी रुपये व्यय करावे लागत आहेत.

या घरामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक हिंसक घटना घडून त्यात मरण पावलेल्या लोकांचे आत्मे त्या ठिकाणी भटकत असल्याच्या भीतीने तेथे कुणीच रहात नाही. जपानचे पंतप्रधान योशीहीडो सुगा हे एका छोट्या घरामध्ये सध्या रहात आहेत. वर्ष १९३२ मध्ये सैन्याच्या बंडानंतर तत्कालीन पंतप्रधानांना नौदलाच्या अधिकार्‍यांनी याच निवासस्थानाबाहेर गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या एका घटनेत तत्कालीन पंतप्रधान कोकडा यांचे मेहुणे यांच्यासह ४ लोकांची येथेच हत्या करण्यात आली होती. वर्ष २००१ ते २००६ या काळात पंतप्रधान असलेले चिरोकोई जीमो यांनी या निवासस्थानावरील भूतबाधा नष्ट व्हावी, यासाठी एका शिंटो पुजार्‍यालाही बोलावले असल्याचे समजते.