१. रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी आलेल्या अडचणी
अ. ‘आमचे १५.३.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन होते. १४.३.२०२० ला रात्री घरी जेवण झाल्यावर मला चक्कर येत होती आणि त्रास जाणवत होता. सकाळी उठल्यावरही मला चक्कर येत होती, तरीही मी झोपून न रहाता रामनाथी आश्रमात जायचे असल्याने कामे आवरत होते.
आ. माझे यजमान (श्री. गुरुनाथ) सेवेला बाहेर गेले होते. ते दुपारी ४ वाजता आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘सेवा करून परत येतांना मी पाय घसरून पडलो आणि माझा पायाचा घोटा सुजला आहे.’’
अशा प्रकारे आम्हाला आश्रमात जाण्यापूर्वी अनेक अडचणी येत होत्या.
२. रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती
२ अ. शरीर हलके झाल्यासारखे वाटणे : मला आश्रमात आल्यावर चांगले वाटले. शरीर हलके झाल्यामुळे ‘मनातील अडचणी आश्रमाच्या बाहेरच राहिल्या आहेत’, असे मला जाणवत होते.
२ आ. नामजप करतांना दिसलेले दृश्य : परात्पर गुरुमाऊली पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत मी नामजपाला बसले होते. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘मी साप होऊन परात्पर गुरुदेवांच्या पायाला वेढा देऊन बसले आहे. नंतर तो साप त्यांच्या नाभीजवळ गेला आणि त्यांच्या हातात कमळ पाहून तो कमळामागे लपला. नंतर मला परात्पर गुरुदेव विराट रूपात दिसले. त्यानंतर ते मला श्रीविष्णु रूपात दिसू लागल्यावर मी माझ्या मूळ रूपात आले आणि त्यांच्या पायाजवळ बसून माझ्या चुका सांगू लागले.’
– सौ. गायत्री गुरुनाथ कदम, डोंबिवली, ठाणे.
(३०.३.२०२०)