एखादी कृती करता न येणे, यामागची प्रमुख दोन कारणे

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. एकतर मुळातच त्या कृतीविषयी काही माहिती नसणे.

२. ती न करण्यामागे अहं, आळशीपणा किंवा ती कृती करण्यास न आवडणे, यांसारखे स्वभावदोष आड येणे.

उपाय – कृती करता न येण्यामागचे मूळ कारण शोधून त्यानुसार प्रयत्न करणे आणि ती कृती करतांना देवाला प्रार्थना करणे : साधकांनी ‘यांपैकी नक्की कोणते कारण आहे ?’, याचे चिंतन करावे आणि त्यानुसार प्रयत्न करावेत. साधकांनी कृती करतांना देवाचे साहाय्यही घ्यावे, म्हणजे ती कृती देवाला सांगून करावी. साधकांनी कृती करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी, तसेच परिपूर्ण कृती करतांना ‘मला यातून चैतन्याच्या स्तरावर शिकता येऊन आनंद मिळू दे’, असे देवाला मित्रत्वाच्या भावाने सांगावे.

– श्रीचित्‌शक्‍ति  (सौ.) अंजली गाडगीळ