‘मार्च २०२० पासून मला ‘ऑनलाईन’ सत्संगाचा लाभ मिळत आहे. मला प्रथमोपचारवर्ग, स्वभावदोष निर्मूलन सत्संग, साप्ताहिक सत्संग, भावसत्संग, धर्मशिक्षणवर्ग आदी सत्संग ऐकता आलेे. त्याविषयी प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !
१. झालेले पालट
१ अ. मी सत्संग ऐकू लागल्यापासून माझ्यात अनेक पालट झाले. मी प्रत्येक कृती भावपूर्ण करू लागले. मी इतरांशी नम्रतेने बोलू लागले. ‘माझ्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही’, याची मी काळजी घेऊ लागले.
१ आ. ‘ऑनलाइन सत्संगा’चा लाभ इतरांना होण्यासाठी प्रयत्न करणे, सात्विक उत्पादने वितरित करणे आणि सेवा करतांना अनुभूती येणे : ‘ऑनलाइन सत्संगा’चा लाभ इतरांना होण्यासाठी मी २५ ते २७ व्यक्तींना सत्संगाची लिंक पाठवू लागले. सत्संगाचा लाभ ७ – ८ जणांना होण्यासाठी मी प्रयत्नरत असते. ‘अत्तर, कापूर, उदबत्ती, कुंकू’ यांसारख्या सात्विक उत्पादनांचा लाभ इतरांना मिळावा’, यासाठी मी प्रयत्न करते. मी सनातन पंचांगाचे वितरण केले. ही सेवा करतांना मला अनेक अनुभूती आल्या. मी प्रतिदिन सकाळपासून रात्रीपर्यंत प्रार्थना, कृतज्ञता आणि भावजागृतीचे प्रयत्न करते.
२. अनुभूती
२ अ. गॅस शेगडीच्या मागे एक ज्योत दिसणे आणि ‘अग्निदेवतेचा आशीर्वाद मिळाला’, असे जाणवणेे : एकदा सायंकाळी मी स्वयंपाकघरात ओट्याच्या शेजारी उभी राहून अग्निदेवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून दोन्ही शेगड्या चालू केल्या. शेगड्या चालू करताक्षणी मला शेगडीच्या मागे एक ज्योत दिसली. ‘असे कसे झाले ?’, असे मला वाटले. ‘मागील नळीमधून गॅस येत असेल’, असे वाटून म्हणून मी शेगडीची कळ बंद केली, तरीही मला ज्योत दिसत होती. ती ज्योत संथ, शांत आणि प्रसन्न वाटत होती. ती बोटाच्या २ पेराएवढी उंच होती. मी पुन्हा शेगडी चालू करून मुलांना पहायला सांगितले; मात्र मुलांना ती ज्योत दिसली नाही. मी रात्री आणि दुसर्या दिवशी सकाळी ‘गॅसची गळती झाली आहे का ?’, ते पडताळले; पण तसे काहीच झाले नव्हते. ‘ती ज्योत म्हणजे मला अग्निदेवतेचा आशीर्वाद मिळाला’, असे मला जाणवले.
२ आ. ‘नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भावसत्संगात देवीची स्तुती चालू झाली. तेव्हा माझ्या मूलाधारचक्रापासून ते आज्ञाचक्रापर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे हालचाल होऊ लागली. त्याचे ज्योतीत रूपांतर झाले’, असे मला अनुभवायला आले.
मला या सत्संगाला जोडणार्या सनातनच्या सर्व साधिकांची मी ऋणी आहे.’
– सौ. प्रियांका पांडुरंग सावंत, ठाणे (२७.११.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |