स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन आणि भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांचा बलीदानदिन यांचे औचित्य साधून ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन !

पुणे, ३० मार्च (वार्ता.) –  स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन आणि भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांचा बलीदानदिन यांचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या जीवनातील शौर्य जागवणारे प्रसंग सांगितले. व्याख्यानाचा आरंभ आणि सांगता श्रीकृष्णाच्या श्‍लोकाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. क्रांती पेटकर यांनी केले.

क्रांतीकारकांचे राष्ट्र-धर्मासाठी मोठे समर्थन ! – सुमित सागवेकर

श्री. सुमित सागवेकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण केल्यावर त्यांची साहसी उडी आपल्या डोळ्यांसमोर येते. ‘लेखण्या मोडा अन् बंदुका उचला’, हे त्यांचे वचन आठवते, तर प्रतिकार करत पराजय झाला, तरी चालेल; पण प्रतिकार न करता पराजय स्वीकारल्यास मला अतोनात दु:ख होईल; कारण झुंजत रहाणे, हे माझे कर्तव्यच आहे, असे त्यांचे जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान दर्शवणारे वक्तव्य आठवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तानाजी, बाजीप्रभु, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह हे पुन्हा जन्माला येणार नाहीत, तर आपल्यालाच भगतसिंह, तानाजी, सावरकर यांच्यासारखे व्हायचे आहे, असे उपस्थितांना सांगून भगतसिंह यांच्या जीवनातील एका प्रसंगाची आठवण करून दिली.

भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांना फाशी होणार होती. त्याच्या आदल्या दिवशी एकाने भगतसिंहांना विचारले, ‘‘उद्या फाशी होणार, एवढ्या अल्प वयात मरण येणार, याचे तुम्हाला दु:ख वाटत नाही का ?’’ तेव्हा भगतसिंह म्हणाले, ‘‘मला त्याचे दु:ख वाटत नाही; कारण आम्ही केलेल्या संघर्षामुळे सर्व हिंदूंच्या मुखातून ‘वन्दे मातरम्’, ‘इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा ऐकू येतील. त्यामुळे माझे जीवन यशस्वी झाले आहे. माझ्या राष्ट्र-धर्माच्या समर्पणाने सर्व हिंदू युवकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटावी, असे मला वाटते.’’

हा प्रसंग सांगून राष्ट्र-धर्मासाठी मोठे समर्पण केल्याचे श्री. सागवेकर यांनी लक्षात आणून दिले.

विशेष

  • ‘ऑनलाईन’ व्याख्यानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी जागृत करणारे, तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे छायाचित्र प्रदर्शन पाहून अनेक धर्मप्रेमींना सावरकरांना जवळून अनुभवता आल्याचे जाणवले.
  • अंदमान येथील सेल्युलर कारागृहाचे छायाचित्र प्रदर्शन पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रासाठी सोसलेला त्रास आणि त्यांचा त्याग पाहून अनेक धर्मप्रेमी भारावून गेले.
  •  सर्व क्रांतीकारकांच्या आठवणीत आणि त्यांच्या आयुष्यातील शौर्यप्रसंग समोर अनुभवत व्याख्यान अतिशय उत्साहात पार पडले.
  • व्याख्यानाला १२० धर्मप्रेमी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

धर्मप्रेमींचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

निगम्मा धनगर – व्याख्यानाने शौर्यजागरण झाले. तसेच ‘आपण झाशीची राणी झाले पाहिजे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात जमेल तेवढे प्रयत्न केले पाहिजेत’, असे वाटत आहे.

सचिन गर्जे – जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुणांना आणि त्या वेळच्या सैन्याला प्रोत्साहन दिले, त्याप्रमाणेच आजच्या काळात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

कविता शेळके, पुणे – व्याख्यानातून क्रांतीकारकांची माहिती मिळाली, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात साहाय्य करण्यासाठी उत्साह वाढला. आता त्यानुसार प्रयत्न करीन.

स्वाती शिंदे, पुणे – व्याख्यानातून पुष्कळ चांगली माहिती मिळाली, तसेच शिकायला मिळाले. आपण हिंदु आहोत, याचा अभिमान वाढला. हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता झाली, तसेच स्वतःतील शौर्य आणि शक्ती जागृत झाली.

 प्रशांत गोडवरकर – व्याख्यान ऐकून जन्माने हिंदू आहे, याचा अभिमान वाटला. आता जन्माने नव्हे, तर कर्माने हिंदू होणे आवश्यक आहे, याची जाणीव निर्माण झाली.

 जयश्री भापकर – आपला देव, देश आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांचा विरोध करण्याचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे. हिंदू असल्याचा आणि या मातृभूमीमध्ये जन्म मिळाला, याचा अभिमान वाटला.

नवनाथ बर्डे – व्याख्यानातून ऊर्जा निर्माण झाली. आपण क्रांतीकारकांचे वंशज आहोत, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हायला हवे, हे लक्षात आले.

अनिल दोनवडे – व्याख्यान पुष्कळ चांगले आणि प्रेरणादायी होते. पुरोगामी होत चाललेल्या आजच्या पिढीला क्रांतीकारकांच्या कार्याकडे आकृष्ट करायला पाहिजे.

मोहिनी – राष्ट्र-धर्म कार्यात आपल्या घरातील मुलांनीसुद्धा सहभाग घेतला पाहिजे, अशी इच्छा निर्माण झाली.