बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे आणि मंदिरे यांवर आक्रमणासाठी चिथावणी देणार्‍या धर्मांधाला अटक

अशा धर्मांधांची केवळ अटक होणे पुरेसे नसून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलेदश सरकारवर दबाव आणणे आवश्यक !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमधील सिलहट भागात हिंदूंच्या ८८ घरांवर आणि ८ मंदिरांवर हिफाजत-ए-इस्लाम या धर्मांध संघटनेच्या समर्थकांनी आक्रमण केले होते. या आक्रमणासाठी त्यांना चिथावणी देणारा युनियन परिषदेचा सदस्य आणि युथ लीगचा स्थानिक वॉर्ड अध्यक्ष शाहिद-उल-इस्लाम स्वादीन याला मौलवीबाजार जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली आहे. हिंदु युवकाने सामाजिक माध्यमामध्ये कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर धर्मांधांनी हे आक्रमण केले होते. आतापर्यंत २३ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.