सातारा, १६ मार्च (वार्ता.) – मेढा (जिल्हा सातारा) येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याला मोठ्या धाडसाने पकडले. या दोघांचा गौरव राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस मुख्यालयात केला. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.