हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही धर्मांधांची अशा प्रकारची कृत्ये थांबलेली नाहीत. त्यामुळे आता अजून कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे !

महोबा (उत्तरप्रदेश) – येथे मुन्ना खान उपाख्य असफाक खान याने एका २१ वर्षीय हिंदु तरुणीला ‘हिंदू’ असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे अपहरण केले. अनेक दिवस तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. त्याद्वारे ब्लॅकमेल करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्याला नवीन लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.