Bengaluru Missing Vaidya Hacked To Death : बेंगळुरू (कर्नाटक) येथील हिंदु वैद्याची मुसलमानांनी हत्या केल्याचे ७ मासांनी निष्पन्न

नदीम पाशा, नूर पाशा आणि महंमद गौस यांनी ४५ लाख रुपयांसाठी केली हत्या केली

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील आयुर्वेद वैद्य आनंद यांची नदीम पाशा, नूर पाशा आणि महंमद गौस यांनी हत्या केली. महंमद गौस रंगकामाच्या बहाण्याने वैद्यांच्या घरात घुसला होता. वैद्यांचे घर विकण्याच्या नावाखाली त्याने लाखोंची फसवणूक केली आणि घराची नोंदणी स्वतःच्या नावावर करून घेतल्यानंतर त्याने वैद्यांची हत्या केली. यानंतर महंमद गौसने वैद्यांचे घरही पाडले. त्याला नदीम पाशा आणि नूर पाशा यांनी साहाय्य केले.

१. जेव्हा वैद्य आनंद बेपत्ता झाले, तेव्हा त्यांच्या काकांनी त्यांची चौकशी केली; पण त्यांना काही सुगावा लागला नाही. ७ मास पोलीस आनंद यांचा शोध घेत होते.

२. दूरभाषच्या नोंदीवरून पोलिसांना महंमद गौस याच्यावर संशय आला. यानंतर, त्याची काटेकोरपणे चौकशी केली असता, त्याने सत्य उघड केले आणि ४५ लाख रुपयांचे प्रकरण उघड झाले.

३. महंमद गौस याने सांगितले की, त्यांनी वैद्यांचा मृतदेह नदीत फेकून दिला होता आणि पोलिसांनी तो बेवारस समजून त्याचे अंत्यसंस्कार केले.

संपादकीय भूमिका

अशांना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा होण्यासाठी जलद गती न्यायालयात खटला चालवला पाहिजे !