इम्रान तुर्की आहेत संभल येथील वक्फ विकास महामंडळाचे संचालक !
संभल (उत्तरप्रदेश) – ‘वक्फ बोर्डा’च्या नावावर ज्यांनी अतिक्रमण करून भूमी कह्यात घेतली आहे, त्यांच्याकडून प्रत्येक इंच भूमी परत घेतली जाईल, असे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच म्हटले होते. ‘वक्फ बोर्ड ‘भू-माफिया बोर्ड’ बनला आहे’, असा आरोपही त्यांनी केला होता. या विधानाचे समर्थन राज्यातील संभल येथील वक्फ विकास महामंडळाचे संचालक इम्रान तुर्की यांनी यांनी केले आहे.
इम्रान तुर्की म्हणाले की,
१. योगी आदित्यनाथ यांनी केलेले विधान अगदी बरोबर आहे. उत्तरप्रदेशात वक्फच्या अनुमाने ३५ सहस्र मालमत्ता आहेत, ज्या ८० ते ८५ टक्के लोकांनी अवैधरित्या कह्यात घेतल्या आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही.
२. उत्तरप्रदेशात शेकडो ठिकाणी विकासकामे चालू आहेत; परंतु जर लोकांनी वक्फची भूमी कह्यात घेतली आणि नंतर ती खरेदी-विक्री केली, तर खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही कारागृहात पाठवले जाईल.
३. संभलमध्येही असेच अतिक्रमण होत आहे, जिथे लोकांनी वक्फ भूमीवर घरे बांधली आहेत. हे अतिक्रमण सर्वत्र होत आहेत आणि आमचे सरकार हे अतिक्रमण हटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वक्फ भूमीवर कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण मिळवू दिले जाणार नाही. हे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या दिशेने काम करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.