(म्हणे) ‘महाराष्ट्र आणि बंगाल यांना स्वतंत्र देश घोषित करा !’

खलिस्तानी संस्था ‘सिख्स फॉर जस्टिस’ची ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

ज्या धर्मांधांनी शिखांच्या अनेक गुरूंची हाल हाल करून हत्या केली त्या धर्मांधांच्या पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा, वजिरीस्तान आदी स्वतंत्र देश करण्यासाठी खलिस्तानी का प्रयत्न करत नाहीत ?

नवी देहली – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राज्यांना भारतापासून स्वतंत्र देश घोषित करावे, असे आवाहन खलिस्तानी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’ने (एस्.एफ्.जे.ने) केले आहे.

यू ट्यूब वर ‘फ्री बंगाल फ्री महाराष्ट्र’ नावाने वाहिनी बनवून त्यावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये या संघटनेचा आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने हे आवाहन केले आहे.

 (सौजन्य : FreeBengalFreeMaharashtra)

या संघटनेने प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावणार्‍याला १ कोटी ८३ लाख रुपये देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. यानंतर शेतकरी आंदोलनाच्या अंतर्गत ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी लाल किल्ल्यावर शिखांच्या धर्माचा झेंडा फडकावण्यात आला होता.