रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेच्या ‘स्टँडिंग वॉरंट’ विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

नगर – ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा आणि सत्र न्यायालयात, पारनेर न्यायालयाने काढलेल्या ‘स्टँडिंग वॉरंट’ विरुद्ध पुनर्निरीक्षण अर्ज प्रविष्ट केला होता. त्यामध्ये वॉरंट रहित करण्याविषयी त्याने विनंती केली होती. हा अर्ज नगरचे प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला आहे. त्यामुळे पारनेर न्यायालयाने दिलेला ‘स्टँडिंग वॉरंट’चा आदेश कायम आहे.

आरोपी बोठे अजूनही पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत; मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. बोठेला काही राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोपही रुणाल जरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात आणि माध्यमांसमोर केला आहे.