इराणमध्ये हत्येच्या आरोप असणार्‍या महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही तिच्या मृतदेहाला दिली फाशी !

इस्लामी देश असलेल्या इराणची क्रूर मानसिकता यातून लक्षात येते ! अशा बुरसटलेल्या लोकांची मानसिकता पालटण्यासाठी कोणतीही मानवाधिकार संघटना, निधर्मीवादी, तथाकथित पुरो(अधो)गामी कधीही पुढाकार घेत नाहीत, हे लक्षात घ्या !

जाहरा इस्माइली

तेहरान (इराण) – येथे जाहरा इस्माइली या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. तिच्यावर पतीच्या हत्येचा आरोप होता. यामुळे तिचा मृत्यू झाल्यानंतरही शरीयत कायद्यानुसार तिच्या मृतदेहाला फाशी देण्यात आली. तिच्या सासूला मुलाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी या शिक्षेची कार्यवाही व्हावीशी वाटत असल्याने असे करण्यात आले.


इराणमध्ये ‘डोळ्यांच्या बदल्यात डोळा’ असा नियम आहे. यानुसारच सासूला तिच्या मुलाच्या मृत्यूचा सूड घेण्याचा अधिकार मिळाला आहे. जाहरा इस्माइलीच्या मृतदेहाचे हातपाय बांधून खुर्चीवर बसून गळ्यात फास घालण्यात आला होता. यानंतर सासूने खुर्चीला लाथ मारली. त्यामुळे मृतदेह लटकला आणि जाहरा इस्माइलीच्या मृतदेहाला फाशी मिळाली.