कार्तिक कृष्ण अष्टमी (२३.११.२०२४) या दिवशी मथुरा सेवाकेंद्रातील साधिका कु. मनीषा माहुर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिका सुश्री (कु.) पूनम चौधरी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. मनीषा माहुर यांना ३० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. साहाय्य करण्याची वृत्ती
१ अ. मोकळेपणाने बोलून साधनेला दिशा देणे : ‘११.७.२०२४ या दिवशी गुरुदेवांच्या कृपेने मनीषाताईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाली. पूर्वी मला तिच्या समवेत देहली सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली होती. आता जुलै २०२४ पासून मथुरा सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली आहे. ताईसमवेत मी एकाच खोलीत रहाते. काही प्रसंग झाल्यास आम्ही दोघी एकमेकींशी मोकळेपणाने बोलतो. कधी काही प्रसंग झाला, तर माझे मन त्यात अडकते. तेव्हा ‘त्या प्रसंगातून काय शिकायचे आणि काय सोडायचे ?’, हे ताई मला सहजतेने सांगते.
१ आ. एखाद्या प्रसंगात माझी मनःस्थिती चांगली नसेल, तर ‘इतरांना समजून कसे घ्यायचे ? त्यांच्याविषयी सकारात्मक विचार कसा करायचा ?’, हे ताई मला अत्यंत स्थिर राहून सांगते.
१ इ. साधिकेची स्थिती पाहून तिला साहाय्य करणे : मला अनेक वेळा रात्री आध्यात्मिक त्रासामुळे शारीरिक कष्ट होतात. रात्री ताईची झोपमोड होऊ नये; म्हणून मी हळूवारपणे नामजपादी आध्यात्मिक उपाय करते, तरीही बर्याच वेळा ती झोपेतच मला विचारते, ‘तुला काही साहाय्य हवे आहे का ?’ मला त्रास होत असल्यास ‘रात्री माझे पाय चेपून देणे, उदबत्ती लावणे किंवा मला नामजपादी उपाय सांगणे’, असे साहाय्य ताई करते.
१ ई. प्रेमभावाने काळजी घेणे : ताई कधी बाहेर सेवेत व्यस्त असली, तरी ‘तुझी प्रकृती बरी आहे ना ? महाप्रसाद घेतलास का ?’, असे लघुसंदेश पाठवून माझी विचारपूस करते. मथुरा सेवाकेंद्रात मनीषाताई वयाने सर्वांत लहान आहे, तरीही ती सर्वांची ‘आध्यात्मिक आई’ झाली आहे. सर्वांना तिचा आधार वाटतो. पूर्वीच्या तुलनेत ताईमध्ये प्रेमभाव पुष्कळ वाढला आहे.
२. साधकांची अडचण समजून तत्त्वनिष्ठतेने त्यांना चुका सांगणे : ताईमध्ये प्रेमभावासह तेवढीच तत्त्वनिष्ठताही आहे. इतरांच्या चुका सांगतांना ताई समोरच्या साधकाची अडचण समजून घेऊन उपायांसहित चुका सांगते. त्यामुळे योग्य कृती करण्यास साधकांना प्रोत्साहन मिळते.
३. शिकण्याची वृत्ती : सद़्गुरु पिंगळेकाकांनी मला ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र आणि शिकवण’ हा ग्रंथ वाचायला सांगितला आहे. प्रतिदिन रात्री खोलीत आल्यावर ताई मला ‘आज काय काय वाचलेस ? तुला काय शिकायला मिळाले ?’, याविषयी विचारते.
४. ऐकण्याची वृत्ती : ताई सहसाधकांनी सांगितलेले साधनेचे प्रयत्न पुष्कळ तळमळीने करते. एका साधकाने तिला सांगितले, ‘‘कुणी आपल्याशी कसेही वागले, तरी आपले मन शुद्धच असायला हवे.’’ यासाठी ताई नेहमी प्रयत्नशील असते.
५. सेवेची तळमळ
५ अ. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवाकेंद्रातील सर्व सेवा करणे : मनीषाताई अखंड सेवारत असते. ती ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवाकेंद्रातील अनेक सेवा करते. काही सेवा अकस्मात् आल्या, तर त्यासुद्धा ती करते. तिने २४ घंट्यांचे पूणर्र् नियोजनच केलेले असते. ताईला स्वतःचे वैयक्तिक आवरायलाही अगदी अत्यल्प वेळ लागतो.
५ आ. दायित्वाच्या अनेक सेवा करणे : मनीषाताईकडे मथुरा सेवाकेंद्रातील अनेक दायित्वाच्या सेवा आहेत. ‘मथुरा येथे अध्यात्मप्रसार करणे, सेवाकेंद्रातील सत्संग आणि बालसंस्कारवर्ग घेणे, साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास नामजपादी उपायांच्या संदर्भात समन्वय करणे, तसेच प्रासंगिक सेवा, उदा, स्मरणिकेची संरचना अंतिम करणे’, अशा अनेक दायित्वाच्या सेवा असतात. इतकी व्यस्तता असूनही ताई व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करते.
५ इ. अखंड गुरुसेवेचा ध्यास असल्याने कशाचीही आसक्ती नसणे : ताईला मायेतील गोष्टींमध्ये आसक्ती नाही. ती आवश्यक तितकेच साहित्य स्वतःजवळ ठेवते. ती मायेतील कोणतीच गोष्ट करत नाही. तिला अखंड गुरुसेवेचाच ध्यास असतो.
६. संतांप्रती भाव
६ अ. सद़्गुरु पिंगळेकाकांचे आज्ञापालन करणे : ताईचा सद़्गुरु पिंगळेकाका यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. सद़्गुरुकाका जी सूत्रे सांगतात, त्यांचे ती पूर्णपणे आज्ञापालन करते. सद़्गुरु काकांनी काही सूत्र सांगितले आणि कृती करण्यास ताईचा संघर्ष होत असला, तरी गुर्वाज्ञापालन म्हणून ती संघर्षाने मात करून ते सूत्र पूर्ण करते. सुमारे एक मासापूर्वी तिच्याकडे अनेक सेवा एकदम आल्या. त्या वेळी साधक संख्याही अल्प होती. तेव्हा सद़्गुरु काकांनी ताईला सांगितले, ‘‘सेवा अधिक असतील, तर काही उपक्रम आपण रहितही करू शकतो.’’ यावर ताईने त्यांना सांगितले, ‘‘काही रहित करायला नको. आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो.’’
एकदा मी ताईला विचारले, ‘‘मी साधनेचे कसे प्रयत्न करू ?’’ तेव्हा ताईने अत्यंत कृतज्ञताभावात सांगितले, ‘‘सद़्गुरु पिंगळेकाकांचे सूक्ष्मातून चरण पकडून ठेव. ते सांगतील, तसे करत रहा.’’
६ आ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना अपेक्षित अशी साधना करायला हवी’, अशी तळमळ असणे : मनीषाताईचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. एकदा साधनेच्या संदर्भात बोलतांना ताई म्हणाली, ‘‘मी साधनेचे योग्य प्रयत्न केले, तरच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आनंद होईल ! त्यांना अपेक्षित अशी साधना मला करायला हवी.’’
७. मनीषाताईमध्ये जाणवत असलेले पालट
अ. पूर्वी मनीषाताईचा स्वभाव अबोल होता. आता ती सर्व साधकांमध्ये मिसळते. तिचे अनौपचारिक बोलणेही साधनेच्या संदर्भातच असते.
आ. पूर्वी काही प्रसंग घडल्यास ताईचे मन अस्थिर होत असे. आता ती पुष्कळ स्थिर झाली आहे.
इ. पूर्वीच्या तुलनेत ताईचा चेहरा आता निरागस झाला आहे; पण साधनेच्या दृष्टीने तिच्यात पुष्कळ परिपक्वता जाणवते. ‘इतक्या लहान वयात ‘मायेतील अलिप्तता, अखंड गुरुसेवा आणि साधनेचा अखंड ध्यास कसा असायला हवा ?’, याचा आदर्श ताईने आम्हा सर्वांसमोर ठेवला आहे.
अशा अनेक गुणांनी युक्त अशी साधिका गुरुकृपेने मथुरा सेवाकेंद्राला मिळाली आहे. यासाठी आम्ही गुरुदेवांच्या पावन चरणी अखंड कृतज्ञ आहोत.
– सुश्री (कु.) पूनम चौधरी, मथुरा, उत्तरप्रदेश. (३.११.२०२४)
मथुरा येथील सेवाकेंद्रात आलेल्या हितचिंतक वैद्यांना वाटलेले मनीषाताईचे कौतुक !
‘एकदा झुंझुनू, राजस्थान येथील हितचिंतक वैद्य श्री. ओमदत्त, त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांच्यासह मथुरा येथील सेवाकेंद्रात आले होते. त्या वेळी मनीषा माहुर हिने पुष्कळ प्रेमाने त्यांची चौकशी केली. मनीषाताईमधील ‘शालीनता, सहजता आणि प्रेमभाव’ या गुणांचे कौतुक करून श्री. ओमदत्तजी म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला कोटीशः नमन करतो.’’
– सुश्री (कु.) पूनम चौधरी
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |