पेण (जिल्हा रायगड) येथील सनातनच्या साधिका सौ. दीपाली दिवेकर ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित !

प्रशस्तीपत्रक स्वीकारतांना सौ. दीपाली दिवेकर (डावीकडे)

पेण – येथील सनातनच्या साधिका सौ. दीपाली दिवेकर यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्या वेळी त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. येथील पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सौ. दीपाली दिवेकर यांनी कोरोनाच्या काळामध्ये आशा स्वयंसेविका म्हणून गावपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली होती, तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अंतर्गतही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी सौ. मनीषा म्हात्रे यांनी सौ. दीपाली दिवेकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले.