रामनाथी आश्रमातील श्री. चेतन हरिहर यांना साधनेविषयी सुचलेली काही सूत्रे

श्री. चेतन हरिहर

१. गुरुकृपेचे महत्त्व

​मी दुरून पाहिल्यावर ध्येय मला फार दूर वाटत होते. पुढे मला साधना समजल्यावर गुरुदेवांनी माझा हात पकडला आहे, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी ध्येय कितीही दूर असले, तरी ते गाठणे अशक्य नाही, याची मला जाणीव झाली.

२. संघर्षाला सामोरे जाण्याचे महत्त्व

​संत मीराबाईंनी संघर्षातूनच कृष्णाला प्राप्त केले. भक्त प्रल्हादाला संघर्षातूनच नृसिंहाचे दर्शन झाले. संघर्षानंतरच भगवंत स्वतः संत तुकाराम महाराजांना न्यायला आला. संघर्षातूनच असे मोठे-मोठे संत झाले. या सर्व संतांच्या संघर्षासमोर आपला संघर्ष काहीच नाही !

३. गुरुप्राप्तीचे महत्त्व

​मनुष्यजन्म मिळणे भाग्याचे आहे, त्यापेक्षाही गुरुदेव आपल्या जीवनात येणे, हे अधिक सौभाग्यपूर्ण आहे.

– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (एप्रिल २०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक