तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेल्या श्रीमती स्मिता सुरेश घाडगे !

तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेल्या कोल्हापूर येथील श्रीमती स्मिता सुरेश घाडगे !

मार्गशीर्ष पौर्णिमा (३०.१२.२०२०) या दिवशी श्रीमती स्मिता सुरेश घाडगे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मूळच्या कोल्हापूरच्या आणि आता रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती स्मिता घाडगे

श्रीमती स्मिता सुरेश घाडगे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. खडतर प्रारब्ध असूनही झोकून देऊन साधना करणे

‘घाडगेकाकूंमुळेच आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात येऊन साधनेत आलो. श्रीमती घाडगेकाकूंचे प्रारब्ध फार खडतर आहे. त्यांचा २० वर्षांचा मुलगा देवाघरी गेला आणि नंतर पुढे घाडगेकाकांचेही निधन झाले. त्यांना मानसिक आजार असलेली श्‍वेता नावाची मुलगी आहे. काकूंचा स्वभाव भोळा आणि भित्रा होता; मात्र त्यांनी स्वतःचा संसार सांभाळून व्यष्टी साधनेची घडी बसवली. त्यानंतर त्या समष्टी साधनाही (सेवाही) झोकून देऊन आणि आनंदाने करू लागल्या. त्या श्‍वेतालाही साधनेत साहाय्य करीत आहेत. त्यांची श्री गुरूंवरची श्रद्धा आणि तळमळ वाढली आहे.

सौ. वैशाली मुद्गल

२. काही काळ परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या घरी रहाणे आणि काकूंचे जीवन गुरुमय होणे

काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या घरी ६ मास राहिले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी वापरलेल्या वस्तू त्यांनी काकूंना आध्यात्मिक लाभ व्हावा, यासाठी दिल्या आहेत. काकूंच्या ध्यानीमनी गुरुस्मरण असते. त्यांचे जीवन गुरुमय झाले आहे. त्यांच्या घरी अनेक संत आणि सद्गुरु राहून गेले आहेत. ते काकूंना चैतन्य आणि शक्ती देतात; म्हणून काकू कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. ‘ही सगळी गुरुकृपा आहे’, अशी त्यांची श्रद्धा आणि भाव आहे.

३. सेवेची तळमळ

अ. रामनवमी, हनुमान जयंती, दत्तजयंती, महाशिवरात्री इत्यादी सणांच्या दिवशी त्या सनातन-निर्मित पंचांग, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे विक्रीकक्ष लावतात. त्या उन्हातान्हांतही सेवा करतात.

आ. गुरुपौर्णिमेच्या वेळी त्या सर्व साधक आणि संत यांच्या अल्पाहार अन् भोजन यांचे नियोजन करतात.

४. प्रेमभाव

अ. त्या विक्रीकक्षावर जातांना इतर साधकांसाठीही भोजनाचा डबा आणि खाऊ घेऊन जातात.

आ. आताच्या आपत्काळाला तोंड देण्यासाठी त्या साधकांना आधार देतात.

५. भाव

‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत सतत असतात’, असा त्यांचा भाव असतो.

नम्र, शांत, निर्मळ, त्यागी वृत्ती आणि शरणागतभाव हेही गुण त्यांच्यात आहेत.

‘काकूंची लवकर आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक